Operation Sindoor Press Conference : ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं – कर्नल सोफिया कुरेशी

Operation Sindoor Press Conference : ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं – कर्नल सोफिया कुरेशी

| Updated on: May 08, 2025 | 6:19 PM

Colonel Sofia Qureshi : भारतीय लष्कराने ड्रोन हल्ले करून पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती देण्यात आली.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार करून तीव्रता वाढवली. अनेक क्षेत्रात मोर्टार आणि तोफ खान्याचा वापर केला. पुंछ, उरी, कुपवाडा, बारामुला, मेंढक राजौरीत केलं आहे. १६ लोकांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिला आणि पाच मुलांचा समावेश आहे, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. कालपासून पाकिस्तानात भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर राबवलं जात आहे. आज देखील भारतीय लष्कराने ड्रोन हल्ले करून पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी सोफिया कुरेशी बोलत होत्या.

पुढे माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की,  भारतावरील सैन्याच्या ठिकाणी हल्ला केल्यास उत्तर देऊ असं आम्ही सांगितलं होतं. ७ आणि ८ तारखेला पाकिस्तानने भारताच्या अनेक सैन्य ठिकाणावर हल्ला केला. त्यांनी एकूण १५ ठिकाणावर हल्ला केला. ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला वायू रक्षा प्रणालीने निष्क्रीय केला. या हल्ल्याचा ढिगारा अनेक ठिकाणाहून गोळा केला. तो पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा. आज सकाळी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानच्या अनेक स्थानांना समान क्षेत्रात आणि समान तीव्रतेने निशाणा बनवलं. लाहोर येथील वायू रक्षा प्रणालीला निष्क्रीय करण्यात आलं, असंही यावेळी कुरेशी यांनी माहिती देताना म्हंटलं.

Published on: May 08, 2025 06:19 PM