Balasaheb Thorat Threatened : हाती भगवा, गांधींचा फोटो अन्… किर्तनकार भंडारेंची थोरातांना धमकी, निषेधार्थ कुठं निघाला शांती मोर्चा?

Balasaheb Thorat Threatened : हाती भगवा, गांधींचा फोटो अन्… किर्तनकार भंडारेंची थोरातांना धमकी, निषेधार्थ कुठं निघाला शांती मोर्चा?

| Updated on: Aug 21, 2025 | 11:42 AM

कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावर "आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल" असे वक्तव्य करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला. यानंतर संगमनेरमध्ये मोर्चा निघालाय.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान एक वाद झाला होता. या प्रकरणी आठ ते दहा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीसोबत विविध सामाजिक संघटना मोर्चात सहभागी होत असल्याची माहितीही मिळतेय. यशोधन कार्यालयापासून प्रांत कार्यालयापर्यंत जाणाऱ्या या मोर्चानंतर निषेध सभा आयोजित करण्यात आली असून मोर्चात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांचेसह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी असणार आहेत.

Published on: Aug 21, 2025 11:37 AM