Congress : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार? मोठी माहिती आली समोर

Congress : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार? मोठी माहिती आली समोर

| Updated on: Jun 30, 2025 | 5:19 PM

पालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कॉंग्रेसकडून आता चाचपणी केली जात असल्याचं समोर आलं आहे.

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कॉंग्रेसची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर तोटाच होऊ शकतो, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणण आहे. या संदर्भात कॉंग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मत मांडलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिका तसंच इतर महापालिका निवडणुकांसंदर्भात कॉंग्रेसच्या गोटातून ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करा, अशा सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

गेल्या साडेतीन तासांपासून एआयसीसीमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झालेले आहेत. याच बैठकीत मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढायची का? याबाबत चर्चा सुरू आहे. मविआमधून निवडणूक लढली तर पक्षाला तोटा होऊ शकतो, असं मत मुंबईतल्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Jun 30, 2025 05:19 PM