Digvijaya Singh Meets Thackeray : काँग्रेसचे दिग्विजय सिंह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला अन् महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट असली तरी राष्ट्रीय राजकारणावर चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी आज मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिग्विजय सिंह मुंबईत त्यांच्या व्यक्तिगत कामानिमित्त आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहे. काँग्रेसने नुकतीच मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत दोन भिन्न मतप्रवाह समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित चर्चा अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, राजकीय चर्चा निश्चितपणे झाली असणार अशी अटकळ बांधली जात आहे.
Published on: Dec 04, 2025 04:00 PM
