Pahalgam : हल्ल्यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी…., काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षाचा खळबळजनक दावा
रांची येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलत असताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. यावेळी त्यांनी मोदींवर ही गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले.
पहलगाम हल्ल्यावर बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक खळबळजनक दावा केल्याचे समोर आले आहे. खर्गे म्हणाले, पंतप्रधान मोदींना हल्ल्याच्या तीन दिवस आधी गुप्तचर यंत्रणाकडून एक अहवाल मिळाला होता. हा अहवाल मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचा जम्मू आणि काश्मीर दौरा रद्द केला असल्याचे दावा खर्गे यांनी केला. ते रांची येथे बोलत होते. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर यंत्रणांकडून एक अलर्ट मिळाला मिळाला होता, असा दावा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांनी केला. देशाच्या गुप्तचर संस्थांनी दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. या माहितीनंतरच पंतप्रधान मोदींनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला. अशा परिस्थितीत जेव्हा गुप्तचर संस्थांनी दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती, तेव्हा सरकारने त्याबद्दल सर्वांना सतर्क का केले नाही? असा आक्रमक सवाल देखील खर्गेंनी केला.
