‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं, विजय वडेट्टीवारांचा भाजपसह पंकजा मुंडेंना टोला

| Updated on: Jul 13, 2021 | 4:53 PM

कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पंकजा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय.

Follow us on

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आज त्यांच्या वरळीतील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना धीर देत राजीनामे देऊ नका, असा आदेश दिलाय. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत. त्याचबरोबर कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पंकजा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय.

पंकजा मुंडे यांच्या याच वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत.