Goa Election 2022: गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार; काय म्हणाले पवार?

| Updated on: Jan 11, 2022 | 11:30 PM

गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे, अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व तेथील कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू असल्याचे पवारांनी म्हटले..

Follow us on

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. गोव्यात सेना-राष्ट्रवादीकडून मविआचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.