उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन् काँग्रेससोबत खटके, ‘या’ दोन जागेवरून हंगामा

| Updated on: Mar 28, 2024 | 10:48 AM

ठाकरेंच्या पहिल्या यादीतच सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी दिल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला. उद्धव ठाकरे यांनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली. तर नाशिकमध्ये उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर यांनी ठाकरेंना बंडाचा इशारा दिलाय

Follow us on

उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे गटातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीतच खटके उडाले. ठाकरेंच्या पहिल्या यादीतच सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी दिल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला. उद्धव ठाकरे यांनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली. तर नाशिकमध्ये उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर यांनी ठाकरेंना बंडाचा इशारा दिलाय. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचा अंतिम फैसला झालेला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी कशी जाहीर केली, असा सवाल काँग्रेसने केला. सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा करत विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलंय. तर ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केलीये. सांगलीबरोबर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरही काँग्रेसने दावा केलाय. याच जागेवरून अनिल देसाई यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….