Nana Patole | त्या वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोले यांचं स्पष्टीकरण

Nana Patole | ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोले यांचं स्पष्टीकरण

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 7:22 PM

हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर आता पटोले यांनी या व्हिडीओबाबत सारवासारव केलीय. मी पंतप्रधान मोदींबाबत नाही तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार टीका करताना सातत्यानं पाहायला मिळतात. आता नाना पटोले यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर आता पटोले यांनी या व्हिडीओबाबत सारवासारव केलीय. मी पंतप्रधान मोदींबाबत नाही तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, असं नाना पटोले म्हणालेत.