Ashok Chavan | वंचितला मत देणे म्हणजे भाजपला मत देणे – अशोक चव्हाण
आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली.हा विजय लोकांचा विजय आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा सर्वजनिक बांधकममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
“महाराष्ट्रात यावेळी काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त मतदान मिळाले. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही.आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली.हा विजय लोकांचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसने बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. त्यानिमित्त ते नांदेडमध्ये बोलत होते.
