कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढले
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या 24 तासांत 79 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 355 रुग्ण हे उपचाराधीन आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे घरातच क्वारंटाइनमध्ये आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या 24 तासांत 79 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 355 रुग्ण हे उपचाराधीन आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे घरातच क्वारंटाइनमध्ये आहेत. यात कोणताच रुग्ण गंभीर नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी केलं आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास महानगरपालिका सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणं आढळल्यास तर त्वरित कोरोना चाचणी करुन घ्यावी, असंही त्यांनी नागरिकांना सांगितलंय.
Published on: Jun 17, 2022 01:36 PM
