Nitesh Rane यांना कोर्टाचा मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

| Updated on: Feb 01, 2022 | 7:00 PM

सत्र न्यायालयाने आज राणेंना पुन्हा दणका दिला आणि जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर राणेंना अटक होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळात आम्ही पुन्हा हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांकडून देण्यात आली. आता सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन फेटाळल्याच्या आदेशाची प्रत हाती लागताच नितेश राणेंनी पुन्हा जामीनासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case )प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane bail reject) यांच्या अडचणी चांगल्याच वााढल्या आहेत. कारण आजही नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून सावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आमदार नितेश राणेंची धावाधाव सुरू आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळ्यानंतर राणेंनी हायाकोर्टात (High Court) धाव घेतली, तिथेही दिलासा न मिळाल्यानं राणें सुप्रीम कोर्टात गेले, त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांना दहा दिवसांची मुदत देत, सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. सत्र न्यायालयाने आज राणेंना पुन्हा दणका दिला आणि जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर राणेंना अटक होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळात आम्ही पुन्हा हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांकडून देण्यात आली. आता सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन फेटाळल्याच्या आदेशाची प्रत हाती लागताच नितेश राणेंनी पुन्हा जामीनासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी पुन्हा हायोकोर्टात अर्ज दाखल केला आहे.