Pranjal Khewalkar : खडसेंच्या जावयाचा पाय खोलात… महिलेचा नको त्या अवस्थेत चोरून काढला व्हिडीओ अन्…

Pranjal Khewalkar : खडसेंच्या जावयाचा पाय खोलात… महिलेचा नको त्या अवस्थेत चोरून काढला व्हिडीओ अन्…

| Updated on: Aug 15, 2025 | 2:54 PM

प्रांजल खेवलकरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. एका महिलेने त्यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी जाणार असल्याची चर्चा आहे. एका महिलेने सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. ज्या तक्रारीमध्ये महिलेने चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती मिळत आहे. महिलेच्या या तक्रारीनंतर या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळतेय. याआधी ड्रग्ज प्रकरणामुळे खेवलकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेशी संबंध ठेवताना, चोरून व्हिडीओ काढल्याचा महिलेने सायबर पोलिसांकडे आरोप केल्याचे सांगितले जात आहे. याआधीही प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, हा नवीन गुन्हा त्यांच्यासाठी एक मोठी कायदेशीर समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच याप्रकरणासंदर्भात अधिक माहिती समोर येऊ शकतो.

Published on: Aug 15, 2025 02:53 PM