‘कराड पेक्षा मोठा आका’, काठ्या अन् बेल्टने मारहाण, धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल; व्हिडीओ व्हायरल

‘कराड पेक्षा मोठा आका’, काठ्या अन् बेल्टने मारहाण, धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 13, 2025 | 5:19 PM

दादा खिंडकर यांनी बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर मारहाणीचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिंडकर बीडच्या बाभुळवाडीचे सरपंच आहेत आणि धनंजय देशमुख यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर मारहाण आणि घरावर हल्ला असे आरोप आहेत.

दादा खिंडकर यांनी आज बीडच्या एसपी ऑफिसमध्ये स्वतःला. बीड पोलिसांसमोर सरेंडर केल्याचे पाहायला मिळाले. सध्या दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात आहे. दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि घरावर हल्ला असे दोन गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. दादा खिंडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा खिंडकर हा बीडच्या बाभुळवाडी या गावाचा सरपंच असून धनंजय देशमुख यांच्या नातेवाईक आहे.

दरम्यान, दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३०७ अपहरण, कट रचणे यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. बीड पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर खिंडकरला अटक दाखवण्यात आलं. १३ जानेवारीला धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून आंदोलन केलं, त्यावेळी खिंडकरही सहभागी होता. दादा खिंडकरनं एका युवकाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्यावर खळबळ उडाली. दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पायावर काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती. दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा आका असल्याचं ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते म्हणाले. तर अमरसिंह पंडित यांनी खिंडकरला राजश्रय दिल्याचा आरोप परमेश्वर सातपुते यांनी केला आहे.

Published on: Mar 13, 2025 05:19 PM