Dahi Handi 2025 : गो..गो..गो.. गोविंदा… दादर, मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा भरपवसात मोठा उत्साह, यंदा काय खास?
मुंबई ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस असूनही गोविंदांचा जराही उत्साह कमी झालेला दिसत नाहीये. तर गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळतंय
राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो. अशातच मुंबईतील दादरमधील आयडिअल बूक डेपो, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणची दंही हडी नेहमीच चर्चत असते तर दुसरीकडे ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या नेहमी लक्ष वेधून घेतात. यंदाही मुंबईसह ठाण्यात नेहमी प्रमाणेच दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईत कालपासूनच मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असतानाही पुरूष गोविंदा पथकांसह महिला पथकांची देखील दहीहंडी फोडण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळतेय.
ठाणे संकल्प प्रतिष्ठान वतीने शिवसेना माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या कडून दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. २० वर्ष परंपरेची, २० वर्ष अभिमानाची साजरी करूया दहीहंडी संकल्प असे बॅनर्स ठाण्यात पाहायला मिळतंय. गोकुळाष्टमीची पूजा करत मराठी कलाकारांनी या ठिकाणी हंडी फोडली. हास्य जत्राच्या टीमने या दही हंडीला हजेरी लावत चार चाँद लावले तर मराठी कलाकार चेतना भट्ट हिला कलाकार हंडी फोडण्याचा मान मिळाला.
