Jai Jawan Govinda Pathak : जय जवान गोविंदा पथकाची कमाल, 9 थर अन् ठोकली सलामी, कुठे रंगला गोविंदांचा थरार?
मुंबईतील दादरमधील आयडिअल बूक डेपो, जांभोरी मैदान या ठिकाणची दंही हडी नेहमीच चर्चत असते. याच दादरमधील एका दहीहंडीला जय जवान गोविंदा पथकाने ९ थर लावत सलामी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह दादार, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली अशा विविध ठिकाणी गोविंदा पथकांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबईत कोसळत असला तरीही देखील गोविंदांच्या उत्साहात तसूभरही कमतरता दिसत नाही. भर पावसात गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्यास सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत दरवर्षी जय जवान गोविंदा पथकाची चांगलीच चर्चा असतो. यंदाही जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडीसाठी झालेल्या सराव त्यांच्या प्रयत्नातून पाहायला मिळत आहे. दादर येथील दहीहंडी उत्सहात जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावत लहानग्या चिमुकलीसह सलामी ठोकल्याचे पाहायला मिळाले आहे.
Published on: Aug 16, 2025 12:57 PM
