Mumbai News : राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ‘राज’दरबारी! काय झाली चर्चा? पाहा VIDEO

Mumbai News : राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ‘राज’दरबारी! काय झाली चर्चा? पाहा VIDEO

| Updated on: Jul 17, 2025 | 1:09 PM

महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्रातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावेळी नाशिकचे मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांवर मंत्री उईके यांच्याकडून अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला.

पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार आणि मंत्री उईके आदिवासी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत. या विरोधात कर्मचारी नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 30 कोटी रुपये असताना सरकारने 84 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यामुळे 54 कोटी रुपये जास्त कशासाठी खर्च केले जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. पाटील म्हणाले, “या कर्मचाऱ्यांचा पगार 30 कोटी रुपये आहे, तरीही सरकारने 84 कोटींचे टेंडर काढले. हे अतिरिक्त 54 कोटी रुपये कशासाठी? 1,41,000 आदिवासी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे.” या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

Published on: Jul 17, 2025 01:08 PM