Devendra Fadnavis Video : दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून ‘देवाभाऊं’चं कौतुक, ‘पुन्हा येईन म्हटलं होतं अन्…’
एका चिमुकल्याने दावोस दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला होतात, आणि तुम्ही खरंच पुन्हा आलात, हे मला खूप छान वाटतंय" असं सांगत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 साठी दावोस येथे उपस्थित होते त्यावेळी चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यावेळी एका चिमुकल्याने देवेंद्र फडणवीस यांना खास भेट देऊन कौतुक केलं. सध्या या चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकला असा म्हणताना दिसतोय, “माननीय देवेंद्र फडणवीस काका, माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट… मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला होतात, आणि तुम्ही खरंच पुन्हा आलात, हे मला खूप छान वाटतंय. असंच तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा, आता मी तुमचे स्वित्झर्लंडमध्ये स्वागत करणार आहे, असं म्हणत “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी…” अशा मराठी अभिमान गीताच्या काही ओळी ऐकवत चिमुकल्याने देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. तर यावेळी देवेंद्र फडणवीस काहीसे भारावले आणि त्यांनी त्याचा गालगुच्चा घेत पाठीवर कौतुकाची थापही दिली.
