Ajit Pawar : ‘समृद्धी’ उद्धाटनावेळी पत्रकारांचा सवाल, दादा कसं वाटतंय? अन् अजित पवार आपल्या स्टाईलनं म्हणाले…

Ajit Pawar : ‘समृद्धी’ उद्धाटनावेळी पत्रकारांचा सवाल, दादा कसं वाटतंय? अन् अजित पवार आपल्या स्टाईलनं म्हणाले…

| Updated on: Jun 05, 2025 | 5:07 PM

आज समृद्धी महामार्गाच्या अंतिम आणि चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. शिंदेंनंतर फडणवीसांनी या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचे दिसून आले.

आज समृद्धी महामार्गाच्या अंतिम आणि चौथ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किलो मीटरचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर ८० किलोमीटर आणि तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी २५ किलोमीटर असा आहे. शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. समृद्धीच्या उद्धाटनावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना दादा कसं वाटतंय? असा सवाल केल्याचे पाहायला मिळाले. यावर अजित पवार यांनी त्यांच्याच स्टाईलनं उत्तर दिले. गार-गार वाटतंय असं खुमासदार उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिलंय.

Published on: Jun 05, 2025 05:07 PM