Ajit Pawar : मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत. महायुतीने आश्वासन दिल्या प्रमाणे कर्ज माफी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन कोणी दिलं? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना विचारला आहे. पत्रकारांनी शेतकरी कर्ज माफीचा प्रश्न अजितदादांना विचारला त्यावेळी त्यांनी कर्ज माफीचं आश्वासन कोणी दिलं असा उलट प्रश्न केला. तसंच मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हंटलं.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात निवडून आल्यावर 100 टक्के शेतकरी कर्ज माफीची घोषणा केली होती. मात्र सत्ता स्थापन झाल्यावर पुढचे 2 वर्ष कर्ज माफी मिळणार नसल्याचं महायुतीने स्पष्ट केलं. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला, त्यावेळी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन कोणी दिलं? असा उलट प्रश्न अजित पवारांनीच पत्रकारांना केला.
Published on: May 02, 2025 04:00 PM
