कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काल भाजप, आज काँग्रेस, तर उद्या…’

कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काल भाजप, आज काँग्रेस, तर उद्या…’

| Updated on: May 14, 2023 | 8:22 AM

VIDEO | लोकसभा निवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं भाष्य, काय व्यक्त केला विश्वास?

नागपूर : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झालेत. या निकालावरून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे समोर आले तर भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीच्या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, मला पॉलिटिकल बोलायचं नाहीय. राजकीय बोलायचं नाहीय. पण ही चांगली गोष्ट आहे. हेल्दी गोष्ट आहे. प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही होतो. आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. कर्नाटकसाठी चांगली गोष्टी आहे. काही इश्यू नाही. तर लोकसभेशी या निवडणुकीचा काही संबंध नाही. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी हेच निवडणूक जिंकतील, असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्नाटक निवडणूक निकालाबाबत बोलायचं नसलं, तरी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मदर्स डे निमित्त त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Published on: May 14, 2023 08:22 AM