Eknath Shinde :  ‘यांचे दौरे म्हणजे मुझको चाहिए काजू-बदाम पाणी मै उतरेतो सर्दी-जुकाम’, शिंदेंचा कुणावर खोचक टोला?

Eknath Shinde : ‘यांचे दौरे म्हणजे मुझको चाहिए काजू-बदाम पाणी मै उतरेतो सर्दी-जुकाम’, शिंदेंचा कुणावर खोचक टोला?

| Updated on: Oct 02, 2025 | 9:39 PM

सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी देखील शेतकऱ्यांची भेट घेतली. यावरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली. शिंदे म्हणाले, यांचे दौरे यांचे म्हणजे खुदको चाहिये काजू बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. सगळे लोक चिखलामध्ये बसले, असे म्हणत ठाकरेंवर खोचक टोला लगावला. तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झाला पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावला रॅम्प वॉक चालू होता.. असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Published on: Oct 02, 2025 09:39 PM