Eknath Shinde : फडणवीस तेव्हा हुडी घालून मला भेटायचे.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा ‘तो’ किस्सा

| Updated on: Dec 10, 2025 | 11:55 AM

नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीसांना सभागृहातील बिग डी संबोधत, हुडीने विरोधकांना हुडहुडी भरायची या विधानाने त्यांनी राजकीय सलोख्याचे प्रदर्शन केले.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सलोख्याच्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात, नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देत, शिंदेंनी फडणवीसांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी फडणवीसांसाठी “कोई कितना भी चाहे हमे जुदा नही कर पाएंगे” अशी शायरी सादर केली. शिंदेंनी फडणवीसांना “सभागृहातील बिग डी” असे संबोधले. अमिताभ बॉलिवूडमधले बिग बी असतील, तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत, असे ते म्हणाले. डी चा अर्थ डिव्होशन, डेडिकेशन आणि डिटरमिनेशन असा असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

“हम वो नही जो दिल तोड देंगे, थामकर हाथ फिर साथ छोड देंगे. पाणी की तरह है ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नही होंगे,” अशा शब्दांत त्यांनी आपली मैत्री व्यक्त केली. शिंदेंनी फडणवीसांच्या राजकीय कार्यशैलीचेही कौतुक केले. “देवेंद्रजी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर. दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर,” असे ते म्हणाले. या प्रसंगाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, फडणवीस अनेकदा त्यांना हुडी घालून भेटायला यायचे आणि त्यांच्या या हुडीमुळे विरोधकांना हुडहुडी भरायची. हा लढा विचारांसाठी, जनमताचा आदर न राखणाऱ्या आणि लोकशाहीच्या विरोधात, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवणाऱ्यांच्या विरोधात होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 10, 2025 11:55 AM