Jay Pawar Engagement : शरद पवारांच्या आशीर्वादानं अजितदादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न अन् पवार कुटुंब एकत्र

Jay Pawar Engagement : शरद पवारांच्या आशीर्वादानं अजितदादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न अन् पवार कुटुंब एकत्र

| Updated on: Apr 10, 2025 | 8:43 PM

जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र आले आहे. अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर हा साखरपुडा समारंभ संपन्न झाला. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची हजेरी पाहायला मिळाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी या साखरपुड्याच्या समारंभासाठी विशेष हजेरी लावली. जय पवार यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्याजवळच्या गोठावडे गावामधील अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर संपन्न झाला. जय पवार यांचा साखरपुडा सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत पार पडला. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. या समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बघा या सोहळ्याचे एक्सक्लूसिव्ह दृश्य…

Published on: Apr 10, 2025 08:43 PM