पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, पोलिसांची वाहनानं प्रवास करण्यास मनाई

पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, पोलिसांची वाहनानं प्रवास करण्यास मनाई

| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 1:55 PM

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू असून एकूण 126 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 79 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आलं.

राज्यात पावसाचा जोर कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरं जाणाऱ्या विदर्भातील काही जिल्ह्यांत मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू असून एकूण 126 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 79 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आलं. अनेक गावांचा संपर्क तुटला असून अर्धापूर आणि भोकर तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेला.

Published on: Jul 14, 2022 01:55 PM