Mumbai Mayor | मुंबई महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप – सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
मुंबई महापौर प्रक्रियेला आता वेग आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात भाजप आणि शिंदेंची शिवसेना गट स्थापन करणार आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गटस्थापनेनंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रियेला ७ दिवसांचा अवधी लागू शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची महापालिकेतील गट नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेला विलंब झाला. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने कोकण आयुक्तालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह गट नोंदणी न केल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र मुंबई महापौर प्रक्रियेला आता वेग आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात भाजप आणि शिंदेंची शिवसेना गट स्थापन करणार आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गटस्थापनेनंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रियेला 7 दिवसांचा अवधी लागू शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिका नियमानुसार सर्वसाधारणपणे 7 दिवसात सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.
