Delhi Blast : मोठी अपडेट…एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्ली बॉम्बस्फोटाने देश हादरला असून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्लीतील ब्लास्ट प्रकरणात महत्वाची घडामोड घडली आहे. या ब्लास्ट प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका हुंडई आय- २० कारमध्ये सायंकाळी ६.५२ वाजता मोठा स्फोट झाला. या ब्लास्टमध्ये एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर या घटनेत २४ जण जखमी झाले असून त्यांना लोकनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या संदर्भात ही हुंडई आय- २० कार हरियाणा पासिंगची असून तिचा मालक नदीम खान असल्याचे प्राथमिक तपासात म्हटले जात आहे.
ज्या वाहनात स्फोट झाला ते वाहन घटनास्थळी हळूहळू चालत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी लोक नायक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.
Published on: Nov 10, 2025 10:10 PM
