Delhi Red Fort Blast Video : गाड्यांची मोठी गर्दी, आगीचा भडका; स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्..
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या दृश्यांमध्ये स्फोट होताच सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. या नवीन फुटेजमुळे पोलिसांच्या तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या दृश्यांमध्ये स्फोट होताच संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. लाल किल्ला परिसरातील हे फुटेज असून, या घटनेनंतर आगीचा मोठा लोट उठल्याचेही यात कैद झाले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस नियंत्रण कक्षातील कॅमेऱ्यांमधील आहे. स्फोटावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक होती. अनेक गाड्या, रिक्षा आणि मोटारसायकली थांबलेल्या दिसल्या. एका i20 कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली असावीत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा या नवीन फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. या घटनेची गांभीर्यता दर्शवणारे हे फुटेज तपासासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
Published on: Nov 12, 2025 01:05 PM
