Delhi Lal Quila Blast : क्षणार्धात सगळेच हादरले; आरडा-ओरड, किंचाळ्या अन्… भीषण स्फोटाचा नवा Video समोर, बघा काय होती स्थिती?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ i20 Hyundai कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी i20 Hyundai कारमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि आगीचे लोट उठले, ज्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, अज्ञातांविरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कलम 16 आणि 18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेण्यात आले आहे, तर सध्याचा मालक पुलवामा येथील तारीक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलीस, एनआयए आणि सीआयएसएफ पथके घटनेचा सखोल तपास करत आहेत. या घटनेचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Published on: Nov 11, 2025 10:43 AM
