Delhi Assembly Election Result : दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशभराच लक्ष आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं असून आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर होत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशभराच लक्ष आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं असून आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर होत आहेत. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदान केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतमोजणीचे सुरूवातीच कल हाती आले असून सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पहायला मिळत आहे. मात्र आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते हे मात्र पिछाडीवर दिसत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री आतिषी, तसेच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे तिघेही पिछाडीवर आहेत. सध्या आप 12 जागांवर तर भाजप 11 जागांवर आघाडीवर दिसत आहे.
Published on: Feb 08, 2025 08:39 AM
