Ajit Pawar | खळखट्याक म्हणत, अजित पवार यांनी राज ठाकरेंची शाळा घेतली

| Updated on: May 07, 2022 | 2:08 AM

सत्ताधारी असो की विरोधक. राष्ट्रवादीचा असला तरी कारवाई करायला लावणार. टोल हटाव आंदोलन केले आणि टोल तिथेच राहिलेत, पुढे काय झालं, हायवे चांगले पाहिजे असतील तर टोल द्यावा लागेल. उत्तर भारतीयांना चले जावं म्हंटल या पठ्ठ्याने आणि सर्व बांधकाम थांबलीत. खळ खट्टयाक कुणाला म्हणता येईल, त्याने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का ? असा सवाल अजित पवारांनी केला.

Follow us on

YouTube video player

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला.  आपला कायदा, संविधान या मार्गाने पुढे गेलो तर भारत एकसंघ राहु शकतो. कोरोनाची परिस्थिती बददली आहे, मात्र अजून पूर्ण बदलली नाहीय, अजूनही काळजी घ्यावी लागेल. चीनने कोरोनासारख्या आजारामध्ये जगाला लोटलं. पूर्वपदावर एसटी यायला लागलीय, मात्र त्यातून काय मिळवलं, राज्य सरकारचे नुकसान झालं,ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं काय झालं आपण बघितलं. समाज समाजात तेढ निर्माण होईल असं केलं जातंय. हनुमान चालीसा वाचायची असेल तर तुम्ही तुमच्या घरात म्हणा ना, दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा, शेवटी काय झालं राणा परिवारावर टीका. कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचं काम कुणी करू नये. अल्टीमेटम देण्याचं काम करू नका? सत्ताधारी असो की विरोधक. राष्ट्रवादीचा असला तरी कारवाई करायला लावणार. टोल हटाव आंदोलन केले आणि टोल तिथेच राहिलेत, पुढे काय झालं, हायवे चांगले पाहिजे असतील तर टोल द्यावा लागेल. उत्तर भारतीयांना चले जावं म्हंटल या पठ्ठ्याने आणि सर्व बांधकाम थांबलीत. खळ खट्टयाक कुणाला म्हणता येईल, त्याने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का ? असा सवाल अजित पवारांनी केला.