अजित पवार यांचा शपथ विधी आटोपला, फडणवीस म्हणतात, ‘आम्ही तिघे मिळून राज्याला… ’

अजित पवार यांचा शपथ विधी आटोपला, फडणवीस म्हणतात, ‘आम्ही तिघे मिळून राज्याला… ’

| Updated on: Jul 02, 2023 | 4:15 PM

आधी 2019 मध्ये राजकिय भूकंप आणत भाजपसोबत जाण्याचा मार्ग पत्करला होता. मात्र त्यावेळी त्यांनी त्यांनी केलं बंड पुर्णत्वास गेलं नव्हतं. पण यावेळी त्यांनी आपलं बंड पुन्हा एकदा यशस्वी करताना 30 एक आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत जाण्याचं ठरवत सरकारमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत महाराष्ट्राला एक धक्काच दिला आहे. त्यांनी आधी 2019 मध्ये राजकिय भूकंप आणत भाजपसोबत जाण्याचा मार्ग पत्करला होता. मात्र त्यावेळी त्यांनी त्यांनी केलं बंड पुर्णत्वास गेलं नव्हतं. पण यावेळी त्यांनी आपलं बंड पुन्हा एकदा यशस्वी करताना 30 एक आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत जाण्याचं ठरवत सरकारमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना, जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं घडल्याचं म्हटलं आहे. तर यातून महाराष्ट्रात एक विकासाचा अध्याय लिहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघं मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारं सरकार आम्ही देवू,” असंही फडणवीस म्हणालेत.

Published on: Jul 02, 2023 04:15 PM