ओबीसींविरोधात मविआचे लोक कोर्टात, फडणवीसांचा सरकारला टोला

| Updated on: May 07, 2022 | 1:24 PM

ओबीसींचं राजकीय आरक्षण केवळ गेलंच नाही तर आरक्षणाचा मुडदा पडलाय. महाविकास आघाडी सरकारने पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devednra Fadanvis)यांनी केला आहे.

Follow us on

ओबीसींच्या आरक्षणाविरोधात (OBC reservation) जाणारे काँग्रेसचेच लोक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण केवळ गेलंच नाही तर आरक्षणाचा मुडदा पडलाय. महाविकास आघाडी सरकारने पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devednra Fadanvis)यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme court) दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा फटकारलं. तसंच पुढील दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या प्रलंबित असलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याची नामुश्की महाराष्ट्र सरकारवर ओढवली आहे. त्यामुळे विरोधक आणि भाजप नेत्यांनी या विषयावरून आता महाविकास आघाडी सरकारला चांगलंच घेरलं आहे.