Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचे मविआ सरकारवर नेमके काय आरोप ?

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचे मविआ सरकारवर नेमके काय आरोप ?

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 6:45 PM

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय. त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव नोंद होईल’, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच नाही तर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय.

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय. त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव नोंद होईल’, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच नाही तर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. मुंबईत आज भाजपच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ या सरकारचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल. आता कोरोना आहे म्हणून हे सरकार आपल्याला थांबवू शकत नाही. दोन वर्ष करोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होतो. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते चालणार नाही, असा सूचक इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

Published on: Nov 16, 2021 06:45 PM