Air India : चिंता करण्याचं कारण नाही… DGCAकडून क्लीन चिट, एअर इंडियानं चौकशीत दिली मोठी माहिती
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या अपघातानंतर, डीजीसीएने देखरेख वाढवण्याचे आदेश दिले आहेत. विमान अपघातात एका प्रवाशांशिवाय सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या देखभालीच्या समस्येवर चिंता व्यक्त केली होती.
एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानात कोणतेही तांत्रिक बिघाड नाही, नागरी विमान नियामक संघटना DGCA च्या चौकशीत विमान कंपनी एअर इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या मेन्टेनन्समध्ये कोणतीही त्रुटी आढळली नाही. तर एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनरमध्ये सुरक्षा संबंधित चिंता नाही, असं एअर इंडियाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सांगत त्यांना आश्वस्त केलं आहे. तर विमानं उशिरा उडत असेल तर प्रवाशांना विश्वासात घेऊन माहिती द्या, असेही DGCA ने एअर इंडियाला सांगितले आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या वाढत्या समस्येनंतर आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर DGCA ने कठोर पावलं उचलत सुरक्षा आणि मेन्टेनन्सवर पूर्णपणे लक्ष द्या, अशा प्रकारच्या सूचनाच एअर इंडियाला दिल्या होत्या. त्यानंतर एअर इंडियाचं विमान टेकऑफ करण्यापूर्वी त्याची पूर्णतः तपासणी करण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले होते.
