Dharashiv : बळीराजा हतबल…अतिवृष्टीला महिना उलटला तरी एक रूपयाही मदत नाही, शेतकरी अद्याप आशेवर अन् मदतीची प्रतीक्षा
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महिना उलटला तरी भूम आणि परंडा येथील शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. पंचनामे होऊनही एक रुपयाही न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बाणगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर तातडीने आर्थिक मदतीची मागणी जोर धरत आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महिना उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. भूम आणि परंडा या भागातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी, शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही मदत आलेली नसल्याने ते हतबल झाले आहेत. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावातून बाणगंगा नदी वाहते. या नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरपरिस्थितीला आता एक महिना पूर्ण झाला आहे. शेतकरी अंगद ढगे यांच्या शेतातील द्राक्षाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, ती आजही आडवी पडलेली दिसते. त्यांच्या बोअरमध्ये आणि विहिरीमध्ये घळ पडली आहे, सौर पॅनल वाहून गेले आहे आणि सोयाबीनचेही नुकसान झाले आहे.
Published on: Oct 21, 2025 12:46 PM
