Kunal Patil : राहुल गांधींना धक्का! निकटवर्ती माजी आमदार भाजपच्या वाटेवर

Kunal Patil : राहुल गांधींना धक्का! निकटवर्ती माजी आमदार भाजपच्या वाटेवर

| Updated on: Jul 01, 2025 | 4:20 PM

Dhule Congress : धुळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती समजले जाणारे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे. कुणाल पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हाती घेतल्याने धुळ्यात मात्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील भाजपच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रायगड निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विकास कामांना निधी मिळत नाही असंही त्यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आज अखेर कुणाल पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Published on: Jul 01, 2025 04:20 PM