Balasaheb Thorat | समाजात दरी निर्माण करण्याची जबाबदारी भाजपने राज ठाकरे यांना दिली असावी

| Updated on: Apr 29, 2022 | 7:59 PM

राज ठाकरे यांची अलिकडची भाषणं, वक्तव्य पाहिली की एक गोष्ट लक्षात येते की, हा भाजपचा अजेंडा आहे. तो ते (राज ठाकरे) राबवत आहेत. आणि समाजात मतभेद निर्माण करणं, जातीय भेद निर्माण करणं, वातावरण गढूळ करणं, धर्माधर्मात दरी निर्माण करणं, अशी जबाबदारी भाजपनं त्यांच्यावर टाकली असावी असं एकंदर मला वाटतं.

Follow us on

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी टीका केली. राज ठाकरे हे भाजपचा (BJP) अजेंडा राबवत आहे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. भाजपकडून राज ठाकरेंवर जबाबदारी टाकण्यात आली आहे की काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. मनसे आणि भाजप एकत्र आले, तर राज ठाकरे यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे, ते संपलेलं दिसेल, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीच्या दिल्ली प्रतिनिधींसोबत बोलत होते. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या पार्श्वभूमीवर आणि भोंग्यांवरुन मनसेनं घेतलेल्लाय भूमिकेवर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. अशातच राज ठाकरेंवर आता बाळसाहेब थोरात यांनीही निशाणा साधत हल्लाबोल केलाय. मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर देण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मे पर्यंतचा अल्टिमेमही त्यांनी दिला होता. या सगळ्यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा समाचार घेतलाय.