Satish Salian : मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान यांनी पुन्हा घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Satish Salian : मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान यांनी पुन्हा घेतली पोलीस आयुक्तांची भेट

| Updated on: Mar 27, 2025 | 5:34 PM

Disha Salian Case : दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी आज दुसऱ्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हंटलं आहे.

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आज पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत वकील ओझा देखील उपस्थित होते. भेट झाल्यानंतर सतीश सालियान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सतीश सालियान म्हणाले की, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. पण माझ्यासोबत आरोपींची देखील नार्को टेस्ट घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी आज देखील नार्को टेस्ट करेल असं त्यांनी म्हंटलं. यावेळी आरोपी कोण कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मला त्यांची नावं घ्यायला आवडत नाहीत, वकील ओझा यांनी जी नावं सांगितली त्याच आरोपींची नार्को टेस्ट व्हावी असं त्यांनी म्हंटलं.

Published on: Mar 27, 2025 05:32 PM