Satish Salian : माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशा सालियानच्या वडिलांचं मोठं विधान

Satish Salian : माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशा सालियानच्या वडिलांचं मोठं विधान

| Updated on: Mar 25, 2025 | 4:41 PM

Disha Salian's Father's Statement : दिशा सालियान हिच्या वडिलांनी आज त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे राजकीय दबाव नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

माझ्यावर कोणाचाच दबाव नव्हता, अशी प्रतिक्रिया स्वत: दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दिली आहे. एकीकडे अॅड. ओझा यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव असल्याचं म्हंटलं आहे. तर दुसरीकडे दिशाचे वडील असं काहीही नसल्याचं सांगत आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहे. सत्ताधारी पक्षाकडून देखील दिशाच्या वडिलांवर दबाव असल्याचं सातत्याने बोललं जात आहे. त्यातच आता दिशा सालियानच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचं उघड झालं आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारे राजकीय असा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचा दबाव नसल्याचं दिशाच्या वडिलांनी म्हंटल आहे. त्यामुळे वकिलाकडून होत असलेले आरोप आणि त्यांच्या पिटिशनमध्ये असलेले आरोप यांच्यात प्रचंड तफावत असल्याचं बघायला मिळत आहे.

Published on: Mar 25, 2025 04:41 PM