Mahadev Munde Case : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्… ज्ञानेश्वरी मुंडेंकडून गंभीर आरोप, पोलिसांनाही अल्टिमेटम
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून कराडने फोन करून तपास थांबवला याबाबत वाल्मिक कराडची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी, अशी देखील मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील परळीतील महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी परळी शहरात निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे काल आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विष प्राशन करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी वाल्मिक कराड याचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ‘धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन करून तपास थांबवला’, असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला. पुढे त्या असही म्हणाल्या की, पोलीस अधीक्षक सकारात्मक आहेत ते मला प्रत्येकवेळी न्याय देतो असं सांगतात मात्र फिक्स वेळ सांगत नाहीत. मी आणखी एक महिन्याचा वेळ देते एक महिन्यानंतर मी जीवन संपवणारच असा अल्टीमेटमही त्यांनी पोलिसांना दिलं आहे.
