Donald Trump : काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
Donald Trump On India-Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे मोठं विधान केलं आहे.
काश्मीरवर तोडगा निघू शकतो का? हे पाहण्यासाठी चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. भारत-पाकिस्तानच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहे, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे मोठं विधान केलं आहे. भारत-पाकिस्तान किंवा काश्मीरविषयी चर्चा ही द्विपक्षीय असणार असं आधीही भारताकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता ही तिसऱ्या देशाची मध्यस्थी भारत मान्य करेल का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
भारत-पाकिस्तानच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धाला पूर्णविराम दिल्याचं जाहीर केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरवरून मोठं विधान केलं असून यावर तोडगा काढता येतो का, यावर चर्चा करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.
Published on: May 11, 2025 11:51 AM
