अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा…अष्टविनायक गणपतींसह ‘या’ 5 मंदिरात आता ड्रेसकोड

अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा…अष्टविनायक गणपतींसह ‘या’ 5 मंदिरात आता ड्रेसकोड

| Updated on: Apr 12, 2025 | 5:24 PM

पुण्यात जर गणपत्ती बाप्पाचे दर्शन घेण्यास जाणार असाल तर पारंपरिक पोशाख परिधान करूनच जा... नाहीतर बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. कारण पुण्यातील काही मंदिरांमध्ये चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान ही पाच मंदिर ज्या ट्रस्टच्या अंतर्गत आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.

मंदिरात प्रवेश हवाय असे कपडे हवेच

पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा.

शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.

महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा.

मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.

कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.

Published on: Apr 12, 2025 05:24 PM