कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून झाडे कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकमधील गोदावरीसह अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीलाही पूर आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
मात्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचे चित्र यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. जिल्ह्यात काही भागांमध्ये रिमझिम पाऊस झाला असला तरी समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. हंडाभर पाण्यसाठी अजूनही स्थानिकांना वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्यांची कामे राहिलीत मात्र पाऊसच नाही.
शेतकरी अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पिकांसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही तुरळक ठिकाणी रिमझिम सरी बरसल्या तरी बहुतांश भाग कोरडाच आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.