काँग्रेसच्या काळात गोव्यात पर्यटनाचा विकास खुंटला – मोदी

काँग्रेसच्या काळात गोव्यात पर्यटनाचा विकास खुंटला – मोदी

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:42 PM

गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचाराच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचाराच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधला. ‘केंद्रातही यापूर्वी अनेक सरकारं आली. पण गोव्याचं महत्व लक्षात घेऊन कार्य केलं गेलं नाही. गोव्याला विकास केला तर भारताला मोठा फायदा होईल हे त्यांच्या डोक्यात कधी आलं नाही. तेव्हा खुर्चीवर असणाऱ्यांना गोव्याची आठवण तेव्हा यायची जेव्हा त्यांना सैर करायची असेल. त्यांच्या काळात गोव्यातील पर्यटनाचा विकास खुंटला होता असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.