Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? ED कडून पुरवणी आरोपपत्र, प्रकरण नेमकं काय?

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? ED कडून पुरवणी आरोपपत्र, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Jul 12, 2025 | 11:23 AM

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात २०१९ पासून आतापर्यंत टप्प्या-टप्प्यांने वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत असताना रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपपत्र दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासह लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचाही आरोप होताय. बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप केला जात असून यापूर्वी बारामती अॅग्रोची ५० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, रोहित पवार यांची याआधी ईडीकडून दोन वेळा चौकशी देखील कऱण्यात आली होती. तर हे पुरवणी आरोपपत्र रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ करणारं मानलं जात आहे.

हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSCB) कथित २५,००० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगशी संबंधित आहे. या प्रकरणात विविध राजकीय नेते आणि बँक संचालक यांच्यावर अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत

Published on: Jul 12, 2025 11:23 AM