Chhagan Bhujbal : ईडी कार्यालयाच्या आगीत मंत्री छगन भुजबळांचा पासपोर्ट जळाला?
ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत मंत्री छगन भुजबळ यांचा पासपोर्ट जळला. भुजबळ यांच्या पासपोर्ट सोबत इतरही काही महत्त्वाची कागदपत्र जळल्याची भीती व्यक्त करण्यात येते. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे?
ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत छगन भुजबळ यांच्या पासपोर्टचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत छगन भुजबळ यांच्या पासपोर्टचं नुकसान झालंय. 27 एप्रिलला ईडी कार्यालयाला आग लागली होती. या आगीत छगन भुजबळ यांचा पासपोर्ट जळलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत आढळला. यामुळेच भुजबळ यांच्या परदेश प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष पीएमएलए न्यायालयानं 29 एप्रिल 2025 रोजी भुजबळ पिता-पुत्रांना परदेश प्रवासाची परवानगी दिली होती. ईडीकडे जमा असलेले त्यांचे पासपोर्ट परत करण्यात आले होते. मात्र, आगीमुळे पासपोर्ट खराब झाल्याने त्यांना नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे भुजबळांना नियोजित परदेश प्रवास करता आला नाही. भुजबळ यांनी विशेष न्यायालयात प्रवासाची मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. भुजबळ फरार होण्याची भीती आहे असं सांगत सरकारी वकील या मुदतवाढीला विरोध केलाय. पण न्यायालयानं ईडीच्या ताब्यात असताना पासपोर्ट खराब झाल्याचं मान्य करत मुदतवाढीला परवानगी दिली.
