Nashik News : खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
अवैध बांगलादेशी प्रकरणात ईडीकडून नाशिकच्या मालेगाव येथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये ईडीची मोठी छापेमारी सुरू आहे. अवैध बांगलादेशी प्रकरणात ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मालेगावात एकूण 9 ठिकाणे ही छापेमारी करण्यात आली आहे. बनावट जन्म आणि मृत्यूचे दाखले बनवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉंड्रींगचा हा प्रकार सध्या उघडकीस आणला जात आहे. या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नाशिकच्या मालेगाव मध्ये देखील अनेल बांगलादेशी नागरिक अवैधरित्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे राहात असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर आता मोठ्या बंदोबस्तात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात आहे.
Published on: Apr 25, 2025 01:53 PM
