Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती

| Updated on: Jun 26, 2021 | 2:43 PM

संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या चौकशीत कदाचित भरपूर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडी अधिकारी पुन्हा अनिल देशमुख यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ईडी देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवणार आहे. त्यानुसार देशमुख यांना पुढच्या आठवड्यात पुन्हा ईडीच्या चौकशीच्या ससेमीराला सामोरं जावं लागणार आहे.

Follow us on

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित 100 कोटी वसुलीप्रकरणाचा आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासात ईडीच्या हातात अनेक पुरावे लागताना दिसत आहेत. ईडीने काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना 4 कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब काहिंनी दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने तर आणखी वेगाने तपास सुरु केला. तपासासाठी ईडीने अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे आणि खासगी पीए कुंदन शिंदे यांना कालच (25 जून) ताब्यात घेतलं आहे. पण त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली

संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या चौकशीत कदाचित भरपूर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडी अधिकारी पुन्हा अनिल देशमुख यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ईडी देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवणार आहे. त्यानुसार देशमुख यांना पुढच्या आठवड्यात पुन्हा ईडीच्या चौकशीच्या ससेमीराला सामोरं जावं लागणार आहे. या प्रकरणात आणखी नेमकी काय काय नवी माहिती समोर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.