Eknath Shinde : सभागृहातही धुरंधरचा फिव्हर… मुंबईला लुटणारा रहमान डकैत कोण? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Dec 15, 2025 | 11:00 AM

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका करत मुंबई लुटल्याचा आरोप केला, तर फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नसल्याचे स्पष्ट केले. या भाषणांमुळे आगामी मुंबई मनपा निवडणूक केंद्रस्थानी आली आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “मुंबईला लुटणारा रहेमान डकैत कोण आहे?” असा सवाल करत शिंदे यांनी मुंबईत रस्ते धुतल्याचे नमूद केले, पण तिजोऱ्या नाही धुतल्या असे म्हणत अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. कॉर्पोरेशन निवडणूक जिंकून आपणच खरे धुरंधर ठरू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईवरून विरोधकांना टोले लगावले. “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल अशी शंका कोणीही मनात आणू नये. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांच्या या भाषणांमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Published on: Dec 15, 2025 11:00 AM